India could have 35 lakh cases by Sept : IISc study
By Benson | Updated: July 16, 2020 15:01 IST2020-07-16T15:01:59+5:302020-07-16T15:01:59+5:30
देशात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाला रोखता आलेलं नाही.
गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, जवळपास 606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची संख्या आहे.
देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या सध्या 9 लाख 68 हजार 876 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार जाणार असल्याचा धक्कादायक अंदाज भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरू(IISc)ने वर्तवला आहे. टाइम्स ऑफ इंडियान
IIScच्या अभ्यासानुसार, सध्याच्या रुग्णवाढीनुसार 1 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाबाधितांची 35 लाख प्रकरणं समोर येतील. येत्या दीड महिन्यांदरम्यान 26 लाख नवीन रुग्ण सापडणार असल्याचं IISCनं सांगितलं आहे.
भारतात 1 सप्टेंबरपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्या घरात असेल. त्यामुळे कोरोना एवढ्यात काही जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
देशात सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, परिस्थिती बदलल्यास 1 सप्टेंबरपर्यंत देशात 20 लाख एकूण रुग्ण असतील.
सध्या देशात एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 एवढा झाला आहे. IISc ने हा अंदाज कोरोनाच्या ट्रेंडनुसार व्यक्त केला आहे.
IIScच्या अभ्यासानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत देशात 1 कोटी कोरोना रुग्ण असतील. तर जानेवारी 2021पर्यंत देशात खतरनाक व्हायरसमुळे तब्बल 10 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो.
IISc राज्यांच्या अंदाजानुसार सध्याच्या ट्रेंडनुसार 1 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 6.3 लाख, दिल्ली 2.4 लाख, तामिळनाडू 1.6 लाख आणि गुजरातमधील कोरोनाचे रुग्ण 1.8 लाखांपर्यंत पोहोचू शकते.
जर परिस्थिती अधिकच बिघडली तर मार्चअखेरपर्यंत भारतात कोरोनाची 6.2 कोटी प्रकरणं असतील.
या काळात देशात 82 लाख सक्रिय प्रकरणे असू शकतात. तर 28 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.